नवी दिल्ली | नविन कृषी कायद्याच्याविरोधात जवळपास 20 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. यातच बाबा राम सिंह नावाच्या शेतकऱ्यानी स्वत: वर गोळी घालून आत्महत्या केली. आता याच मुद्यावरुन काँग्रस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार निशाणा साधला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी बलिदान दिलं आहे. मोदी सरकारने मात्र क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत’, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच ‘सरकारने जिद्द सोडावी आणि कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे’, असंही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे
कुंडली सीमेवरील शेतकर्यांची दुर्दशा पाहून व्यथित झालेल्या कर्नालच्या संत बाबा राम सिंह यांनी आत्महत्या केली आहे. या दुःखाच्या क्षणी आपल्या संवेदना आणि श्रद्धांजली’, अशा शब्दात राहुल गांधींनी बाबा राम सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, बाबा राम सिंह यांनी स्वत वर गोळी झाडून घेतली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या मृत्यूनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
करनाल के संत बाबा राम सिंह जी ने कुंडली बॉर्डर पर किसानों की दुर्दशा देखकर आत्महत्या कर ली। इस दुख की घड़ी में मेरी संवेदनाएँ और श्रद्धांजलि।
कई किसान अपने जीवन की आहुति दे चुके हैं। मोदी सरकार की क्रूरता हर हद पार कर चुकी है।
ज़िद छोड़ो और तुरंत कृषि विरोधी क़ानून वापस लो! pic.twitter.com/rolS2DWNr1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 16, 2020
थोडक्यात बातम्या-
ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे
‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर
…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय
येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ
‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर