Top News महाराष्ट्र मुंबई

“मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवारांना धडा शिकवा, त्यांची सरकारमधून हकालपट्टी करा”

मुंबई | मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा. मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करु नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचं वय वाढत चाललं आहे, त्यांना वेठीस धरायला नको, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी, मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचं?”

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकजूट होऊन लढण्याची गरज- नरेंद्र मोदी

फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन लागू!

“अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा”

नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे- रतन टाटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या