बीड महाराष्ट्र

‘पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा…’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा

बीड | सामाजिक आणि मागास प्रवर्गातंर्गत आरक्षण न देता राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवली तर मराठा समाजाकडून पुन्हा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाविषयी सरकार गंभीर नाही. त्यामुळे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करत पोलीस भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आल्याची टीका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांनी केलीये.

राज्य सरकारने तात्काळ पोलीस भरतीचा निर्णय रद्द करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल, असं अमित घाडगे यांनी सांगितलं.

दरम्यान,राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. ‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाईल, असा शासन निर्णय राज्य सरकारने जारी केला होता. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील- संजय राऊत

अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार; पाहा काय आहे प्रकरण…

मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!

“लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटतं”

ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या