Top News तंत्रज्ञान देश

मारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका

Photo Courtesy- facebook/ Maruti Suzuki

नवी दिल्ली | नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या केिंमतीने शंभरी गाठली आहे. पेट्रोलच्या केिंमतीवरून राजकारण देखील तापलं आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागल्याने लोकांमध्ये नाराजगीचं वातावरण आहे. या इंधन दरवाढीमुळे लोक आता पर्यायी मार्गाचा वापर करताना दिसत आहेत. याच नाराजगीचा फायदा घेत मारूती सुझुकीने ग्राहकांसाठी भन्नाट पर्याय शोधला आहे.

मारुती सुझुकी ऑटो सेक्टर मधील एक आग्रगण्य कंपनी आहे. मारूतीकडे मोठ्या संख्येत सीएनजी गाड्यांचा ताफा आहे. सीएनजी गाड्यांचा बाबतीत मारुती सुझुकी ऑटो सेक्टरमधील एकमेव कंपनी मानली जाते. ह्युंडाईकडे 2 सीएनजी गाडीचा ताफा आहे. तर फोर्डकडे 1 सीएनजी गाडीचा ताफा आहे. मारुती सुझुकीकडे असलेल्या 14 माॅडेलपैकी 8 माॅडेल गाड्यांत सीएनजी पर्याय उपलब्ध आहेत.

येत्या आर्थिक वर्षात कंपनीने विक्रीत 50% ची वाढ गृहीत धरली आहे. यांशिवाय मारुती सुझुकीची प्रतिस्पर्धी कंपनी टाटा, निस्सान, रेनाॅ कंपन्या आहेत. पण यातील कोणत्याही कंपनीच्या उत्पादनात सीएनजी गाडी नाही. याशिवाय टाटा मोटर्स या नविन वर्षापासून इलेक्ट्रीक कार बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, मागील वर्षात मारुती सुझुकीच्या विक्रीत 37% ची वाढ झाली आहे. लाॅकडाऊन आधी विक्रीत 18% ची मोठी घट कंपनीला सहन करावी लागली होती. चालू वर्षात झालेल्या वाढीवरून सीएनजी हा उत्तम पर्याय ऑटो सेक्टरमध्ये असू शकतो. इलेक्ट्रीक गाड्याकडे देखील लोकांचा कल मागील काही वर्षांपासून दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर

काँग्रेसच्या जनआक्रोश राॅलीत डान्सरचे ठुमके, पाहा व्हिडीओ

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी- गणेश नाईक

आधी माझा देश, जगाने धीर धरावा – अदार पुनावाला

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या