बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मीराबाई चानूलाही मिळू शकतं सुवर्णपदक; जाणून घ्या नेमकं कसं!

टोकियो | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकांचं खातं उघडून देणाऱ्या मीरीबाईसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. मीराबाईने चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदत कमावलं होतं. मीराबाईच्या या पदकाने भारताने 2021 च्या ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं. अशातच मीराबाईच्या गटातील सुर्वणपदक मिळवणारी चीनची खेळाडू होऊ झिहुईची डोपिंग चाचणी होणार असल्याची माहिती समजत आहे.

होऊ झिहुईची जर डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळली तर तिला बाद ठरवण्यात येणार आहे. तिचं पदक दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू भारताची मीराबाई चानूला हे पदक मिळणार आहे. एखाद्या खेळाडूने जर पदक जिंकलं असेल मात्र तो जर डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळला तर त्याला बाद करून त्याच्या नंतरतच्या खेळाडूला पदक देण्यात येतं.

आता चीनची खेळाडू जर डोपिंग चाचाणीमध्ये दोषी आढळली तर तिचं सुवर्णपदक हे मीराबाई चानूला मिळू शकतं. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूकडीन सर्व देशवासियांना अपेक्षा होती. तिनेही हिरमोड न करता त्यांच्या अपेक्षा पुर्ण केली.

दरम्यान, मीराबाईच्या या कामगिरीसाठी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीसाठी डोमिनोज पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या-

भास्कर जाधवांच्या त्या वर्तनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दाैरा रद्द; विशेष विमानाने मातोश्रीकडे रवाना

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पुणे पोलिसांनी दिलं चांगलंच बड्डे गिफ्ट!

“मुख्यमंत्र्यांनी चिपळूण दौऱ्यावर खादीचा कुर्ता घातलेला बाऊन्सर नेला होता काय?”

“दिवसभर सायकल चालवून भाजपसाठी काम केलं, तेव्हा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More