‘मी लाभार्थी’ची नवा वाद, भाजप की राष्ट्रवादी नेमकं खरं कोण?

‘मी लाभार्थी’ची नवा वाद, भाजप की राष्ट्रवादी नेमकं खरं कोण?

नाशिक | ‘मी लाभार्थी’ची आणखी एक जाहिरात वादात सापडली आहे. या जाहिरातीवरुन भाजप आणि राष्ट्रवादीने एकमेकांवर कुरघोडी सुरु केली आहे. 

कळवणच्या फुनाबाई पवार ‘मी लाभार्थी’ जाहिरातीत झळकल्या आहेत. मात्र त्यांना मिळालेलं शौचालय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात दिलं गेल्याचा दावा करण्यात येतोय. मुख्यमंत्री या कामाचं श्रेय लाटत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. 

दुसरीकडे या गावात जाऊन फुनाबाईंना दमदाटी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावलं ,असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. हा दावा खोटा असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनी समोर आणला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील केलीय. 

पाहा व्हिडिओ-  

Google+ Linkedin