बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती

नवी दिल्ली | महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेच्याच (Shivsena) जुन्या निष्ठावंत नेत्याने पक्षाची शिस्त मोडत, चाळीस आमदारांना आपल्या गोटात वळवत सत्ता स्थापन केली. आता शिवसेना पक्षाला खासदार देखील सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. एकूण 18 खासदारांपैकी 12 जण शिंदे गटात जाण्याच्या तयारीला लागले आहेत.

महाराष्ट्रात ही तऱ्हा तर दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजे शरद पवारांना (Sharad Pawar) अनपेक्षीत लोक सध्या भेटत आहेत. पवारांच्या भेटीला केंद्रीय सहकार विभागाचे (Ministry of Co-operation) अधिकारी गेले होते. शरद पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर ही माहिती दिली.

शरद पवारांनी ट्विटमध्ये म्हंटलं, मला सहकार मंत्रालयाचे अधिकारी आज दिल्लीत भेटावयास आले. त्यांनी मला माझे सहकार क्षेत्रातील अनुभव सांगण्याची विनंती केली. तसेच त्यांनी माझ्याजवळ सहकार क्षेत्राच्या प्रभावी आणि लोकहितात्मक कामासाठी सल्ले देखील मागितले. शरद पवारांचा सहकार क्षेत्राशी जवळून आला आहे आणि त्यांचा सहकार क्षेत्राचा अनुभव सुद्धा फार मोठा आहे.

भाजप शासीत केंद्र सरकारने 2021 साली सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा (Amit Shah) हे केंद्रीय सहकार मंत्री आहेत. त्यामुळे आता दिल्लीच्या मदतीला महाराष्ट्र धावला असं म्हणता येईल. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राजकीय विरोधक आहेत. तरी त्यांनी एकमेकाची मदत घेतली आणि केली. कारण राजकारणात सर्व काही माफ असते.

थोडक्यात बातम्या –

उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!

सुष्मिताबाबत एक्स बाँयफ्रेंड विक्रम भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

अभिनेता महेश बाबूनंतर अल्लू अर्जुनचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

मोठी बातमी! नाही नाही म्हणत ‘हा’ बडा नेताही शिंदे गटात सहभागी

खासदार नुसरत जहाँचा बेडरूममधील फोटो व्हायरल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More