बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकारला अर्थकारण-प्रशासन कळत नाही फक्त उद्योगपती मित्रांचं हित समजतं”

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यादरम्यान सध्या चांगलीच राजकीय फटकेबाजी रंगली आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाला विविध राज्य सरकारे कडाडून विरोध करत आहेत. केंद्र सरकारनं सध्या अनेक क्षेत्रातील सार्वजनिक भागीदारी संपवण्याचा सपाटा लावला आहे. केंद्र सरकारच्या याच खासगीकरणावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे.

मोदी सरकारला अर्थकारण आणि प्रशासन कळत नाही, अशी खोचक टीका यशोमती ठाकूर यांनी केेली आहे. जोपर्यंत मोदी देशाचे पंतप्रधान आहेत तो पर्यंत देशाचा विकास होणार नाही, फक्त टॅक्स लुटला जाणार आहे. मोदी सरकारला अर्थकारण-प्रशासन कळत नाही, फक्त उद्योगपती मित्रांचं हित समजतं, याची दररोज नवनवीन उदाहरणं समोर येतायत, या शब्दात ठाकूर यांनी मोदींवर टीका केली आहे.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात गेल्या काही दिवसात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून केंद्र सरकार महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देत आहे, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आता राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदींच्या खासगीकरणाच्या नितीवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं देशाची सार्वजनिक विमान कंपनी एअर इंडियाचं नुकतंच खासगीकरण केलं आहे. देशातील विमानतळं आणि रेल्वे स्थानकांचं देखील खासगीकरण झपाट्यानं वाढलं आहे. परिणामी केंद्र सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.

 

थोडक्यात बातम्या 

आरोग्य विभागाच्या वादात मंत्री बच्चू कडू यांची उडी, राज्य सरकारला दिला घरचा आहेर

बाबा राम रहीमसह अन्य पाच साथीदारांना न्यायालयानं ठोठावली ‘ही’ मोठी शिक्षा

नेटफ्लिक्सच्या स्क्विड गेमने मोडले सारे रेकॉर्ड्स! तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्सची कमाई

काय सांगता! विमानाच्या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षाही स्वस्त; काय आहे कारण?

‘मुलगा 18 वर्षाचा झाला असेल तर…’; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More