Top News देश

‘आमचं वेतन घ्या पण…’; खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली ही विनंती

नवी दिल्ली | सोमवारपासून (14 सप्टेंबर) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. लोकसभेत अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी विनंती केली आहे.

कृपया आमचे खासदारांचे पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या निधीत कपात करु नका, अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली आहे.

लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक 2020 मंजूर केलं. या विधेयकाच्या चर्चेदरम्यान नवनीत कौर राणा यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे आता पुढील वर्षभर खासदारांचे 30 टक्के वेतन कापलं जाणार आहे.

दरम्यान, अधिवेशन चालू होण्यापुर्वी अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांची आणि खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये 30 टक्के खासदारांचा कोराना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

“संपूर्ण देश सैन्यासोबत उभा आहे, तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार?”

“राजभवनाचं सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून नामकरण करावं का?”

शरद पवारांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी- खासदार संभाजीराज

‘महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी’; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या