बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास MPSC ची तयारी

मुंबई | एमपीएससीच्या रखडलेल्या गट ब,गट क, आणि गट ड च्या परीक्षा महापोर्टलवर म्हणजेच महापरिक्षा पोर्टलवर घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने या परीक्षा महापोर्टलवर घेण्यात येतील का ? अशी विचारणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली होती. त्यावर आता आयोगाने सकारात्मक उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ‘गट ब आणि गट क’ च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. त्याच बरोबर आयोगाने सरकारसमोर काही मुद्दे आणि अटी देखील मांडले आहेत. यावर सरकारने लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनियम 1965 मध्ये आवश्यक ते बदल करणे. सर्व शासकीय विभागांच्या सर्व संवर्गांचे सेवा प्रवेश नियम आयोगाच्या सहमतीनं सुधारित करणे, लोकसेवा आयोगाकडील मनुष्यबळ वाढवणे, यासह अटींवर लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यास तयार असल्याचं सरकारला कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून कोरोनामुळे भरती परीक्षा रखडल्या आहेत, तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करून घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पण आता एमपीएससी परीक्षांबाबत सकारात्मकता दाखवल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातवरण आहे.

थोडक्यात बातम्या-

सोशल मीडियावर मुलगा बनून तरुणीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, सेक्स टाॅयने ठेवले शारीरिक संबंध

आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आजीने उघडले डोळे अन्…

कोरोनानंतर होणारा ‘म्युकरमायकोसिस’ आजार नेमका आहे तरी काय? वाचा संपुर्ण माहिती

शरीरसंबंध ठेवताना फोटो काढले अन्… पुण्यातील घटनेनं खळबळ

उत्तर प्रदेशच्या जमावाकडून पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला; गाडीची तोडफोड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More