बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आषाढी वारी निमित्त मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा साज, पाहा फोटो!

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. नाटक, मालिका, निवेदन, दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांमध्ये तिनं आपलं कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशातच सध्या मृण्मयीचा मराठमोळ्या साजातील फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.

पांढऱ्या रंगाची साडी, आंबाडा आणि त्यावर गजरा, नाकात नथ, कपाळावर चंद्राची कोर अश्या एका मराठमोळ्या लुकमध्ये मृण्मयीनं फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत मृण्मयीनं म्हटलं, विठूचा गजर, गुरुवार ते शनिवार रात्री 09:30 वाजता, फक्त झी मराठीवर, सारेगमप लिटिल चॅम्प्स. मृण्मयीनं ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ शोमध्ये आषाढी एकादशी स्पेशल भागासाठी हा लूक केला आहे.

मृण्मयीच्या या सुंदर फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये, इतकी ती या फोटोंमध्ये गोड दिसतेय. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर विविध प्रतिक्रिया दिल्या असून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या मृण्मयी छोट्या पडद्यावरील मराठी सारेगमप लिट्ल चॅम्प्समध्ये सूत्रसंचालक म्हणून कार्य करत आहे.

दरम्यान, मृण्मयीच्या अभिनयाच्या पाऊलांवर पाऊल ठेवत तिच्या बहिणीनेही कलाविश्वात पदार्पण केले आहे. तिची ही बहिण म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे. गौतमी सध्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये सईची भूमिका साकारत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

‘वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय ठरले’; पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक!

‘माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं मी मुलाला लाॅंन्च केलं नाही’, ‘या’ अभिनेत्यानं केला खुलासा

‘एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोक चव्हाणांचे आंदोलन’; संभाजीराजे आक्रमक

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शरद पवार रिमोट कंट्रोल”

राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळणार? केंद्रात हालचालींना वेग

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More