मॉडेलसोबत लव्ह जिहाद??? पतीविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई | पती धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मुंबईतील एका मॉडेलनं केलाय. रश्मी शहाबाजकर असं या मॉडेलचं नाव आहे. 

रश्मी यांनी 13 वर्षांपूर्वी आसिफशी लग्न केलं होतं. मात्र तू लग्नानंतरही हिंदूच राहशील, असं आश्वासन त्यांनी रश्मीला दिलं होतं.

आपल्याला मारहाण झाल्याचा तसेच घरातून हाकलून लावण्याची धमकी दिल्याचा रश्मी यांचा आरोप आहे. तसेच मुलाचं अपहरण केल्याचाही आरोप आहे. 

दरम्यान, आपल्या पतीनं दुसरं लग्न केलं असून तिलाही धर्मपरिवर्तन करायला भाग पाडलं, असं रश्मी यांनी सांगितलं. त्यामुळे हे लव्ह जिहादचं तर प्रकरण नाही ना? याचा पोलीस तपास करत आहेत.