बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही”

पुणे | काँग्रेस शिवाय संपूर्ण देशालाच पर्याय नाही, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांनी केलं आहे. कोथरुड येथील नगरसेवक चंदू कदम यांच्यावतीने पाच हजार महिलांचे मोफत लसीकरण मोहिमेचे उद्धाटन रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

काँगेसने आता मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका देखील स्वबळावर लढवली जाणार आहे. काँगेस तशी तयारी देखील सुरु केली असल्याचं नाना पटोलेंनी यावेळी सांगितलं. तसेच सर्व पक्षांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे स्वबळावर लढणं हे काय चुकीचं नाही. तसेच आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून सरकारला कोणताही धोका नसल्याचं नाना पटोलेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या दाढीवाल्यांनी सामान्य लोकांना नोटबंदीवेळी लाईनमध्ये लावून मारलं. देशात तेव्हापासूनच महागाई वाढू लागली आहे. आता देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसेल, असं नाना पोटोले म्हणालेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात अनेकांचे प्राण गेले. कोरोनाबाबत केंद्रांचे नियोजनच चुकल्याने हे संकट वाढत गेले. मोदींनी अमेरिकेतल्या निवडणूकीवेळी ट्रम्प ला भारतात बोलावून लाखोंची जमवलेली गर्दी कोरोनाच्या फैलावला प्रामुख्याने कारणीभूत ठरली असल्याची टीकाही नाना पटोलेंनी  केली.

थोडक्यात बातम्या- 

संतापजनक! मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू अन्….

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवडची तहान भागवणारं ‘हे’ धरण 33.26 टक्के भरलं

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More