बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश”

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तारलेला असताना ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात येण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशा-यावर चालणारे केंद्रातील मोदी सरकार आरक्षण संपवण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आलं असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा डाव असल्याचं पटोले म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-  

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीवरून शरद पवारांची पाटलांवर टीका; म्हणाले…

“ईडी आम्हाला नवीन नाही त्यामुळे देशमुखांवरील कारवाईबाबत आम्हाला यत्किंचितही चिंता नाही”

“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार, संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत आहेत”

ट्विटरचा झटका! केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक

‘बिग बाॅस 14’ विजेती रुबिना दिलैक शोमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा करणार लिलाव

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More