बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा काही दिवसांपुर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची देशभर चर्चा होती. यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले गेले. अशातच यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राहुल गांधींना टोला हाणला आहे.

काँग्रेस आता कुठे आहे का?, ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात तेव्हा तेव्हा तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं म्हणत नारायण राणेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काहीच काम केलं नाही. त्यामुळे ‘सामना’कडे छापण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे ते भाजपबद्दलच्या बातम्या देत असतात. संजय राऊतांना तशी वाईट सवयच असून लोकांना सांगण्यासाठी सामनाकडे काहीच नसल्याचं असल्याचं म्हणत राणेंनी राऊतांवर टीका केली आहे. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवरही भाष्य केलं.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा नसून यामध्ये कोणतंही राजकारण नाही. कोणतीही बदला बदली होणार नाही आणि मोर्चबांधणीही, असं नारायण राणेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने संशय आलेल्या महिलेसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

हिंदू सणांवर निर्बंध लावून सणांचं महत्व कमी करण्याचा ठाकरे सरकारचा डाव- नितेश राणे

मोठी बातमी! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, वाचा काय सुरू, काय बंद?

मुख्यमंत्री आठ वाजता साधणार जनतेशी संवाद, पुण्यातील निर्बंधांबाबत घोषणा करण्याची शक्यता!

‘राजीव गांधींचं नाव हटवताच भारताला सुवर्ण मिळालं’; ‘या’ निर्मात्याचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More