Top News

सर्वसामान्य नागरिकांआधी नेत्यांना कोरोना लस द्या; शिवसेना नेत्याची मागणी

मुंबई | कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर लसीचा प्राधान्यक्रम ठरवताना आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा देखील अग्रकमाने समावेश करावा, अशी मागणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगरसेवक तसेच आमदार, खासदार यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा केली. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या विम्याची सुरक्षा नसताना नगरसेवक दिवसरात्र कोरोना रुग्णांसाठी आजही काम करत आहेत. काम करत असताना काही लोकप्रतिनिधींना आपला जीव गमवावा लागला आहे, असं नरेश म्हस्के म्हणालेत.

महापालिका अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि पोलीस या सर्व यंत्रणाच्या खांद्याला खांदा लावून स्थानिक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या युद्धामध्ये प्रत्येक आघाडीवर काम करताना अनेकांच्या संपर्कात येत असल्यामुळे हायरिस्कमध्ये असतात, असंही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केलं आहे.

समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकप्रतिनिधींना देखील आरोग्याच्या दृष्टीने संरक्षण देणे अत्यंत गरजेचं आहे, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“भाजप कार्यकर्ता नटी म्हणते मुंबई म्हणजे PoK, योगींनी सांगावं ते नेमके कुठे आलेत”

“…तर तृप्ती देसाईंच्या तोंडाला काळं फासू”

ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला जामीन मंजूर!

व्हाईटवॉश टळला! तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर 13 रन्सने मात

लष्करी जवान आणि माजी सैनिकांनाही प्राधान्याने कोरोनाची लस द्या- बाळा नांदगावकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या