बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबीमधील ‘Special-26’चा खुलासा होणार; नवाब मलिक लवकरच करणार नवा गौप्यस्फोट

मुंबई | राज्यात सध्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबी असा वाद रंगताना दिसत आहे. तर नवाब मलिकांचं एनसीबीवरील आरोपांचं सत्रही सुरूच आहे. आर्यन खानच्या अटकेपासुन रंगत असलेल्या या प्रकरणाला रोज वेगळं वळण लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता नवाब मलिक लवकरत एक नवा गौप्यस्फोट करणार आहेत. मलिकांच्या नव्या ट्विटमुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे.

कॉर्डेलिया क्रुझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि पुर्ण एनसीबीच्या विरोधातच नवाब मलिक सध्या आक्रमक झालेले दिसत आहे. नवाब मलिक यांच्या नव्या ट्विटमुळे आता तर्कवितर्क लढवायला सुरूवात झाली आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत ते एनसीबीच्या ‘special 26’चा लवकरच खुलासा करणार असल्याचं सांगितलं आहे.

तर नवाब मलिक यांच्या नावाने एका एनसीबी अधिकाऱ्याने निनावी पत्र पाठवलं आहे. तर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डिजी नार्कोटिक्स यांना पाठवणार असून हे पत्र त्यांना समीर वानखेडेंच्या चौकशीत समाविष्ट करून घेण्याची विनंती करणार असल्याचंही नवाब मलिक म्हटले आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट करत त्यांना आलेलं हे निनावी पत्रही शेअर केलं आहे.

नवाब मलिकांनी सध्या समीर वानखेडे विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही बाजूंनी शाब्दिक वाद रंगत असताना मलिक हे समीर वानखेडेंच्या वैयक्तिक आयुष्यावरूनही काही गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी केलेले सगळे आरोप समीर वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत. असं असताना नवाब मलिक आता काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचच लक्ष लागलं आहे.

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“भाजपचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही; मालकही बदलतील, नाड्याही सुटतील!”

“लसीकरण होऊनही तुमच्या निष्काळजीपणामुळे कोरोना पसरतोय”

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार आली बाजारात, ‘हे’ आहेत भन्नाट फिचर्स

….म्हणून शिक्षक उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र

मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More