बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात, असं कानावर आलंय”

रत्नागिरी | राज्यातील राजकीय वातावरण सध्या केंद्रीय तपास यंत्रणाभोवती फिरताना दिसत आहे.  तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते भाजपवर सातत्याने करत आहे. त्याचबरोबर इतर पक्षातून भाजपमध्ये गेल्यावर चांगली झोप लागते, असे वक्तव्य अलिकडेच भाजप नेत्यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील काही दिवसापासून चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने टीका करत आहेत. हल्ली चंद्रकांत पाटील हे झोपतही बोलतात, असं माझ्या कानावर आलं आहे. त्यामुळे त्यांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका, असा चिमटा जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा काढला आहे. जयंत पाटील हे गणपतीपुळे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

भारतात इतक्या संख्येने लोकसंख्या असूनही शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रस आणि काॅंग्रेस पक्षातील लोकांना केंद्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करत आहे. त्यामुळे बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील काही नेते सांगतात, की भाजपमध्ये आल्यावर चांगली झोप लागते. त्याचा अर्थ असा आहे की भाजपमध्ये गेल्यावर सगळ्यांना अभय आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्यात सध्या आर्यन खान प्रकरणावरून समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या या मुद्य़ावरून चांगलंच तापलेलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ऐन दिवाळीत पाऊस झोडपणार! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

कर्नाटकमध्ये हायअलर्ट जारी! पुनीत राजकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

IPL 2022ची रंगत वाढली! जाणून घ्या कोणता संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार

‘समीर वानखेडेंना बॉलिवूडवर हल्ला…’; दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

“30 हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं सुरू आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More