आज राष्ट्रवादी आपले सगळे पत्ते उघडे करणार?, मुंबईत बोलावली महत्वाची बैठक

मुंबई |  आगामी लोकसभेच्या दृष्टीने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने एका महत्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपले सगळे पत्ते उघडे करणार असल्याचं कळतंय.

सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात ही महत्वाची बैठक होणार आहे. यावेळी उमेदवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तबही करण्यात येणार आहे.

कालच अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबईत गुप्त भेट घेत महाआघाडीच्या प्रवेशासंदर्भात जवळपास दीड तास चर्चा केलेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार माढा लोकसभा लढणार की नाही…. हे सुद्धा आजच समजेल.

काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी दिल्लीत शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आघाडीतल्या जागांसंदर्भात तोडगा काढला असल्याचं समजयतंय. आज होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय-काय पाहायला मिळू शकते, याचा अंदाज येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधीनी साधलं ‘व्हॅलेंटाईन डे’चं औचित्य! म्हणतात… नफरत से नही प्यार से जीतेंगे

‘ढोंग आणि बढाया’ हेच मोदी सरकारचं तत्वज्ञान, सोनिया गांधींचा बोचरा वार

‘RSS हा बेलागम घोडा’, प्रकाश आंबेडकरांची मालेगावच्या सभेत ‘RSS’वर सडकून टीका

होय, मी राज ठाकरेंची भेट घेतली… भेट घेण्यात गैर काय?- अजित पवार

मोदी हटाव देश बचाव; ममता बॅनर्जींचा नवा नारा

Google+ Linkedin