बीडमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश?

औरंगाबाद | राष्ट्रवादीचे बीडमधील दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री फडणीवसांनी क्षीरसागर यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री आणि क्षीरसागर यांच्या भेटीचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मुख्यमंत्र्यांबरोबर पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकताच उरली असल्याचं बोललं जातंय. त्यांचा भाजप प्रवेश झाल्यास मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढेल, असं भाजप नेत्यांकडून बोललं जातंय.