बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशीचे आदेश दिले, पण सीबीआयने धाडच टाकली”

मुंबई | सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा मारला आहे. याआधी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं एफआयआर दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं. याबाबतीत एकूण 4 जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली होती. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झालं, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचं अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असं जयंत पाटील म्हणालेत.

दरम्यान, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. पीपीई किट्स घालून सीबीआयचे अधिकारी छापेमारी करत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी मंत्र्यांच्या पोरांचं ‘एक पाऊल पुढे!’

न्या. एन. व्ही. रमणा भारताचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

“लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था अनिल देशमुखांसारखी होईल”

“खरा सचिन वाझे मंत्रालयावर होता की सिल्वर ओकवर?”

मला डायरेक्ट मेसेज करा, शक्य होईल तेवढी मदत मी करेन- रिया चक्रवर्ती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More