Top News राजकारण

“एकनाथ खडसे यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही”

मुंबई | माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांनतर खडसेंचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

यावेळी शरद पवार म्हणाले, खडसेंसोबत आमची बैठक झाली. यावेळी खडसे यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येऊन कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केलीये.

वाहिन्यांवर अनेक बातम्या येत आहेत परंतु काहीही बदल नाही. जे जसं आहे तसंच राहणार आहे. हे सर्व प्रदेशाध्यक्ष जयंतरावांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय.

पवार पुढे म्हणाले, “आम्हाला धुळे, जळगाव, नंदुरबार येथे अधिक काम करायचे आहे. पक्षात अजून गती यायची असेल तर नाथाभाऊंची गरज आहे. आता नवे-जुने लोकं घेऊन पक्षाची ताकद ते दाखवणार आहेत.”

महत्वाच्या बातम्या-

भाजपसाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन- एकनाथ खडसे

IPL2020- आज मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज; चेन्नईसाठी ‘करो या मरो’ची लढाई

‘काना मागून आला आणि तिखट झाला’; नाव न घेता जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

शरद पवारांच्या उपस्थित एकनाथ खडसेंचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या