मुंबई | संपुर्ण देशभरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर सरकारतर्फे कोरोना लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नवीन महत्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसी या जनतेला मिळाल्या पाहीजे म्हणजे त्यांना कोरोनापासुन वाचवता येईल असं यापुर्वी म्हटलं होतं. त्यानंतर 45 वर्षांवरील सहव्याधी आणि 60 वर्षांच्यावरील सर्वांनाच कोरोनाची लस देण्यास सुरूवात करण्यात आली.
आजपासुन 45 वर्षांवरील सर्वांनाच सरसकट कोरोना लस देण्यास सुरूवात झाली आहे. तसेच आता त्याबरोबरच एक नवा निर्णयही सरकारने घेतला आहे. आजपासुन एप्रिल महिन्यात सर्व दिवस कोरोना लस दिली जाणार आहे. कोरोनाची लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय.
एप्रिल महिन्यात येणाऱ्या राजपत्रित सुट्या तसेच इतर सर्व सुट्यांच्या दिवशी कोरोना लसीकरण सुरू ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढली असताना सरकारने हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुट्यांसह इतर सर्व दिवशी नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, ‘या’ वयोगटात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ
महाविकास आघाडी सरकारचा छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा दणका
धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग; आरोग्य यंत्रणेची कबुली
2 दिवसांत चक्क 4 टन आंब्याची आगाऊ नोंदणी; शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी लढवली ‘ही’ शक्कल
मन हदरवून टाकणारी घटना, एकाच वेळी कुटुंबातील सगळ्यांचे मृतदेह सापडले एकाच घरात
Comments are closed.