बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन

मुंबई | अभिनेता अक्षय वाघमारे बाबा झाला आहे. अक्षयची पत्नी योगिता गवळीने मुलीला जन्म दिला आहे. योगिता ही गँगस्टर अरूण गवळीची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.

अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहे, असं अक्षयने सांगितलं.

आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे, असंही अक्षयने म्हटलंय.

दरम्यान, ​8 मे 2020 रोजी अक्षय व योगिता यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला होता. अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप या मराठी चित्रपटांमध्ये केलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना लस निर्यातीत भारताने दाखवलेली उदारता विसरणार नाही’; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मानले आभार

महाविकास आघाडीत बिघाडी?! काँग्रेसच्या ‘या’ आमदाराने अनिल परबांवर केले गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

आपला कोरोनाशी लढा, पंतप्रधानांशी नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं

1 वर्षाच्या समीशासह शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण!

मोदीजी, बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल, डिझेलवर का काढताय?- रूपाली चाकणकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More