विमानात बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांचे पंख छाटणार!

नवी दिल्ली | विमान प्रवास करताना बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांचा यापुढे ‘नो फ्लाईंग’ यादीत टाकण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केलीय.
कारवाईसाठी ३ प्रकारची वर्गवारी करण्यात आलीय. पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसऱ्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ तर तिसऱ्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. संबंधितावर अनुक्रमे ३ महिने, ६ महिने आणि २ वर्षांसाठी निर्बंध घालण्यात येतील.

खालील बटणांवर क्लिक करुन बातमी Whats App किंवा Facebook वर शेअर करा

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या