नवी दिल्ली | कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ट्विट केलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांना कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी नाकारली आहे, अशी बातमी काही माध्यमांनी दिली होती. मात्र ही बातमी खोटी आहे. आम्ही परवानगी नाकारली नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विट करत त्या ट्विटमध्ये स्क्रीनशॉट टाकत ती बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी NDTV या माध्यमाचं नाव नमूद केलं आहे.
दरम्यान, फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या कंपन्यांनी कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देण्याची मागणी केलेली आहे. या सर्व कंपन्यांच्या अर्जावर केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्थेची (CDSCO) बैठक झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.
This news being run by @ndtvindia is also #FAKENEWS. pic.twitter.com/6UwvVo22Tp
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) December 9, 2020
थोडक्यात बातम्या-
“…तर भाजपला राज्यात 50 पेक्षा जास्त जिंकता लढवता येणार नाही”
मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रिम कोर्टचा नकार, ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी
प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं निधन
महिलेला पार्टीला बोलवून तिच्यासमोर नग्ननृत्य; पुण्यातील विकृत घटनेनं खळबळ
गव्याच्या मृत्यूवर गिरीश कुलकर्णींची प्रतिक्रिया; म्हणाले…