बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात यशवंत जाधव यांची डायरी समोर आली असून त्यातून त्यांच्या व्यवहाराची पोलखोल झाली आहे.

या डायरीत ‘मातोश्री’ला 50 लाखांचं घड्याळ दिल्याची नोंद आहे. याबाबत आयकर विभागाने चौकशी केली असता मातोश्री हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचं यशवंत जाधव यांनी सांगितलं. यावरून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी ट्विट करत ठाकरे कुटुंबावर ताशेरे ओढले आहेत.

मातोश्री वाल्यांना पैसे आणि गिफ्ट दिले तरंच पदं मिळतात हे परत एकदा सिद्ध झालं आहे. ठाकरे कुटंब तुरूंगात गेले पाहिजे तेव्हाच कळेल हे सगळे पैसे जमा करून ठेवले आहेत ती गुफा कुठे आहे. 25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

दरम्यान, तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. ठाकरे कुटंबाचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याने शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! रशियाच्या मागण्यांवर झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात पडळकर तेवढंच काम करतात”

कार चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम लवकरच लागू होणार

“भाजप सत्तेत असतानाच काश्मिरी पंडित बाहेर गेले”

IPL 2022! मिस्ट्री गर्लनं उडवलीय सर्वांची झोप, पाहा कोण आहे ‘ही’ तरुणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More