Top News महाराष्ट्र मुंबई

“राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही”

मुंबई |  समाजात भांडण लावून महाराष्ट्र संकटात आणण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात बारा बलुतेदारांच्या जाती असताना ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही पहारेकरी उभे आहोत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर राणेंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

कुठल्या समाजाला काय मिळेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसारच मिळेल. कुठल्याही मंत्र्याने विचार करून बोललं पाहिजे, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, मी जेथे संधी मिळेल तेथे ओबीसी समाजाचा आवाज उचलून धरणार. पक्ष, जात विसरून फक्त आणि फक्त ओबीसी म्हणून उभा असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

पॉर्न पाहात असला तर सावधान; पुढचे काही दिवस सतर्क राहा, नाहीतर…

निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे लैंगिक अत्याचार नव्हे; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

वडेट्टीवारांची वादग्रस्त वक्तव्ये अन् रोहित पवार म्हणतात, ओबीसींमध्ये अपप्रचार करणाऱ्याला शोधलं पाहिजे

धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बोलल्या, म्हणाल्या…

शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या