बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पनवतीयों का बाप है ये बॉस’; चक्रीवादळावरून नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई |मुंबई, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा फटका बसला. अजूनही चक्रीवादळ मुंबईजवळील समुद्रात असल्याने धोका टळला नाही. कोरोनाचं संकट असताना या चक्रीवादळ संकटानत आणखी भर टाकली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेष राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारला राज्यात सत्तेत येऊन दोन वर्षे झाली. यात 2020 मध्ये आलेलं चक्रीवादळ, 2021 चं चक्रीवादळ, 2021 आणि 2021 मध्ये कोविड रुग्ण आणि मृत्यू संख्येत पहिल्या क्रमांकावर आणि ही कहाणी सुरुच आहे, सर्व काही वाईटच होत आहे. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसंच या ट्विटमध्ये शेवटी नितेश राणे यांनी ‘पनवतीयों का बाप है ये बॉस’, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधदुर्गात खूप नुकसान झालं आहे. घर, गोठे, बागा, मछिमारांचेही नुकसान झालं आहे असं समजतंय. आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत. कुठे कुठे नुकसान झालं आहे याचीही माहिती घेत आहोत. सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू हा विश्वास जनतेला देतो,  असंही नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नितेश राणेंच्या या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे. तौते चक्रीवादळाचा फटका मुंबईलाही बसला आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली असून, मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव, राऊत मुंबईतच अडवणार”

चक्रीवादळातही प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिली महिला, पाहा व्हिडीओ

“सतत केंद्राकडं बोट दाखवण्याची सवय सोडा, राज्य सरकारने असं वागणं बर नाही”

मरीन ड्राईव्हवर समुद्राचं रौद्र रुप; अंगावर काटा अणणारा व्हिडीओ समोर

मिरगीचा झटका येऊन बेशुद्ध पडलेल्या नवरदेवाला शुद्ध येताच धू-धू धुतलं; कारण वाचून व्हाल अवाक्

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More