2024 पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार?

नवी दिल्ली | 2024 पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना नीती आयोगाने केली आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणुकीवर होणाऱ्या खर्चाला कात्री लावण्यासाठी आणि शासकीय यंत्रणेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ही सूचना देण्यात आली आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यावर भाष्य केलं होतं.

दरम्यान, नीती आयोगाने याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाला गांभीर्याने लक्ष घालण्यास सांगितलं आहे. तसेच याप्रकरणी आराखडा बनवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.