सत्तेत येण्याची खात्री नव्हती, म्हणून आश्वासनं दिली; नितीन गडकरींची कबुली

संग्रहीत फोटो

मुंबई | 2014 च्या वेळी आम्ही सत्तेत येऊ की नाही याची खात्री नव्हती म्हणून आम्ही आश्वासन दिली, अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात बोलत होते.

गडकरी म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना आम्ही सत्तेत येऊ असे वाटले नव्हते. त्यावेळी काही जणांनी आश्वासने द्यायला सांगितली. आम्ही एवढी आश्वासने दिली की ती आता आठवतही नाही.

तसंच शरद पवार काय बोलतील आणि काय करतील यावर विश्वास नाही. शरद पवार कोणालाही समजणार नाहीत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवे. त्यांच्याशी संवाद साधायला हवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-आम्ही एक असलो तरी लाखाला भारी; महादेव जानकरांचं वादग्रस्त वक्तव्य

-प्रकाश आंबेडकरांनी भाजपला पाठिंबा द्यावा- रामदास आठवले

-देशासाठी भाजप आणि संघाच्या नेत्यांचा कुत्राही मेला नाही!

-सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव; तर महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचा बादशहा!

-पृथ्वीसाठी ही व्यक्ती आहे खास; पहिलं शतक ‘या’ व्यक्तीलाच केलं अर्पण!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या