बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुख्यमंत्री नाही, तरीही राज्य व्यवस्थित सुरु’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई | यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी अधिवेशन ठरल्याचं पहायला मिळालं. या अधिवेशनात अनेक मुद्द्यावरुन वाद-विवाद झालेले पहायला मिळाले. यातच एका मुद्द्यानं सगळ्याचंच लक्ष वेधलं. ते म्हणजे हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती. यावरुन विरोधी पक्षानं चांगलंच राजकारण चालवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती सध्या ठीक नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास असल्यानं ते सध्या घरुनच सगळं कामकाज पाहत आहेत. मात्र यावरुन विरोधी पक्षांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री सध्या आपल्या खुर्चीवर नाही. ते सध्या आपल्या खुर्चीवर नसतानाही राज्य चांगलं सुरु आहे. राज्य सुरळीत चालण्याचं श्रेय पूर्णपणे राज्यातील जनतेला आहे. राज्यातील जनता संयमी आहे, त्यामुळे राज्य व्यवस्थित सुरू आहे, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि सरकावर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार होते. उद्धव ठाकरेंच्या मणक्याचा आणि मानेच्या स्नायूचा त्रास वाढल्याने त्यांना अधिवेशनाला येणं शक्य नसल्यानं ते उपस्थित नाही राहिले.

थोडक्यात बातम्या – 

देशात कोरोना रुग्णसंख्येत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर

Corona: उद्यापासून पुणे शहरात ‘या’ निर्बंधांचं करावं लागणार पालन

धक्कादायक! पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

मोठी बातमी! पुण्यातील 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद

धक्कादायक! राज्यात तब्बल दोन डझन नेत्यांना कोरोनाची लागण, ‘या’ नेत्यांचा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More