बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर भाजपचे 12 नव्हे, 18 आमदार निलंबित झाले असते- अजित पवार

मुंबई | राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर कार्यवाही करत नसल्यानं महाविकास आघाडी सरकारने भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले, अशी चर्चा आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी 12 आमदार प्रलंबित ठेवले म्हणून 12 आमदार निलंबित केलं अशातला काही भाग नाही, असं अजित पवार म्हणाले.

विरोधी पक्षाकडून काही चुका झाल्या. त्यातल्या काही त्यांनी स्वत:हून मान्यदेखील केल्या. पण 12 विरुद्ध 12 असं काही नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशातला तो प्रकार होता. त्यांच्या 18 आमदारांनी गोंधळ घातला असता तर 12 च्या जागी 18 आमदार निलंबित झाले असते, असं अजित पवार म्हणाले. तसेच निलंबनाची कारवाई जाणूनबुजून करण्यात आलेली नाही, असं अजित पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

भास्कर जाधव यांचा स्वभाव माझ्यासारखाच तापट आहे. त्यांना राग येतो. मात्र तापट स्वभाव असतानाही काल ते शांत होते. त्यांनी सगळ्या गोष्टी मुद्देसूदपणे सांगितल्या, असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून काल विधानसभेत गोंधळ झाला. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘पीक विम्याच्या बीड पॅटर्नमुळे सरकारचा फायदा’; दरेकरांचा गंभीर आरोप

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या परिक्षेच्या तारखा जाहीर

“दोन दिवसांत राज्याच्या हिताचं एवढं काम करणारं हे राज्यातील पहिलं सरकार”

‘सुपरमॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं दुःखद निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More