‘कृषी कायदे मागे घेऊन सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी’; दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 100 दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप या विषयावर कोणताही तोडगा निघाला नाही. तसेच शेतकरीही कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे.
सरकारने मागण्या मान्य न केल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. रविवारी आणखी एका आंदोलक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणारा शेतकरी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील होता. त्यांनी टिकरी बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणापासून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
या शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूला कृषी कायदे जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. माझी शेवटची इच्छा कृषी कायदे मागे घ्यावी अशी आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी हरियाणातील एका शेतकऱ्याने टिकरी बॉर्डरवर विष पिऊन आत्महत्या केली होती. त्याचा नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये पंजाबमधील एका वकिलाने टिकरी बॉर्डरवरील आंदोलनापासून काही किलोमीटरवर विष पिऊन आत्महत्या केली होती.
थोडक्यात बातम्या-
“राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते”
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक
पुणे पोलीस ‘अॅक्शन’मोडमध्ये! गजा मारणेला बेड्या ठोकल्यानंतर शरद मोहोळवर केली ही कारवाई
काय सांगता! लोकांना सापडलाय सोन्याचा डोंगर, सोनं लुटण्यासाठी तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ
…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील- रामदास आठवले
Comments are closed.