Top News देश

‘…नाहीतर 26 जानेवारीला त्सुनामी येईल’; शेतकऱ्यांचा मोदी सरकारला इशारा

नवी दिल्ली |  कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या दहावेळा बैठका झाल्या पण तोडगा निघालेला नाही. यामुळं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कृषी कायदे रद्द न केल्यास राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर मोर्चा निघणारच. बळाचा वापर करुन आम्हाला अडवू नका. नाहीतर 26 जानेवारीला त्सुनामी येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

मागच्या बैठकीच्यावेळी सरकारनं कृषी कायद्यांना दीड वर्षे स्थगिती देऊन शेतकरी आणि सरकारचे प्रतिनिधी यांची एक संयुक्त समिती स्थापन करावी. कायद्यातील तरतुदींबाबत चर्चा करून ही समिती निर्णय घेईल, असा प्रस्ताव ठेवला. मात्र शेतकरी नेते कायदे रद्द करण्यावर ठाम असून, शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्ली ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे.

सरकारच्या मागण्यांवर शेतकरी नेते आज चर्चा करणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी सरकारबरोबर पुन्हा बैठक होईल असं शेतकरी नेते जोगिंदर सिंग यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मुंबई इंडियन्सला धक्का! संघाचा हुकमी एक्का असलेल्या ‘या’ स्टार खेळाडूने फ्रँचायझी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

‘लावा रे तो व्हिडीओ’ म्हणत, आण्णा हजारेंचं मोदी सरकारविरोधात ‘उपोषणास्त्र’

…तर धनंजय मुंडेवर कारवाई करण्याची जबाबदारी आमची- शरद पवार

‘गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करणार असाल तर तुम्ही खरे मर्द’; शिवसेनेची भाजपवर टीका

ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या