‘बिन्ते दिल’ गाणं आऊट, रणवीर आणि अरिजितची जादू

मुंबई | वादग्रस्त पद्मावत सिनेमाचं ‘बिन्ते दिल’ व्हिडिओ साँग यूट्यूबर प्रदर्शित करण्यात आलंय. दीपिका पदुकोननं यासंदर्भात ट्विट केलंय. 

पद्मावत सिनेमाची गाणी सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच लाँच करण्यात आली होती. मात्र फुल व्हिडिओ साँग मात्र प्रदर्शित करण्यात आलं नव्हतं. अरिजित सिंगचा आवाज आणि रणवीरचा अभिनय या गाण्याचं वैशिष्ट्य आहे. 

दरम्यान, सिनेमा यशस्वीरित्या प्रदर्शित झालाय आणि सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शनही करतो आहे. त्यामुळे सिनेमाची स्टारकास्ट तसेच टीम पद्मावत खूश असल्याचं कळतंय. दरम्यान, प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओ गाण्यांवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.