‘पद्मावत’च्या घुमरमध्ये नाही दिसणार दीपिकाची कंबर!

मुंबई | दिग्दर्शक संजय लिला बन्साळीच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमात सेन्सॉरकडून 5 बदल करण्यात आलेत. त्यामुळे घुमर गाण्यात आता दीपिकाची कंबर तसेच पोट दिसणार नाही. 

घुमर गाण्यावर बंदी घालावी, अशी करणी सेनेची मागणी होती. राणी पद्मावतीचं पोट दिसणं म्हणजे त्यांच्या अपमान आहे, असं करणी सेनेचं म्हणणं होतं, त्यामुळे घुमर गाण्यात आता हा बदल करण्यात आला आहे. 

दरम्यान, निर्मात्यांनी हे गाणं पुन्हा चित्रीत न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे VFX तंत्रज्ञानाद्वारे या गाण्यातील दीपिकाची कंबर लपवण्यात आल्याचं कळतंय.