महाराष्ट्र मुंबई

“‘मी पुन्हा येईन’ या ओळींचा त्रास फडणवीसांना पुढची पाच वर्ष होईल”

मुंबई| मी बोललेले नसतानाही मला जनतेच्या मनातली मुख्यमंत्री या वाक्याने गेली 5 वर्ष छळलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही तसंच झालंय. त्यांच्या मनात काही नसेल, मात्र त्यांच्या मी पुन्हा येईल या ओळीेंमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं आणि पुढची पाच वर्ष त्यांना ते छळणार आहे, असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

मी भाजप सोडणार नाही, पराभव झाल्याने मी खचून गेलेली नाही. कोअर कमिटीमध्ये मी राहणार नाही हा निर्णय मी घेतला. कारण 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या 12 दिवसांमध्ये ज्या काही चर्चा रंगल्या किंवा रंगवल्या गेल्या त्यामुळेच मी हा निर्णय घेतला, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

काहीही कारण नसताना मी पक्ष सोडणार, बंड करणार अशा अफवा उठवल्या गेल्या तसंच मी  विरोधीपक्षनेतेपदासाठी आग्रही आहे अशा चर्चांना उधाण आलं. त्यामुळे मी अस्वस्थ आहे  म्हणूनच मी आता कुठल्याच पदावर रहाणार नाही असा निर्णय घेतला आणि भाजप कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

मी पुन्हा एकदा शून्यावर यायचं ठरवलं आहे. पंकजा मुंडे यांचं कर्तृत्व काय? असा प्रश्न विचारला जातो आता हाच प्रश्न मला पुन्हा एकदा स्वतःला विचारायचा आहे. त्यामुळेच मी कोअर कमिटीची सदस्य हे जे एकमेव पद होतं त्याचाही राजीनामा दिला, असंही पंकजा मुंडें यानी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या