नरेंद्र मोदींच्या जीवनावर येणार आणखी एक चित्रपट; परेश रावल मोदींच्या भूमिकेत

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार आहे. भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावल नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहेत.

आमचा चित्रपट नरेंद्र मोदी यांच्या जीवनाच्या जवळ जाणारा असेल, असं परेश रावल म्हणाले आहेत. 

नरेंद्र मोदींची भूमिका साकारणं हे माझ्या जीवनात मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात जास्त आव्हानात्मक राहील, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे, असं परेश रावल यांनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाची निर्मिती परेश रावल स्वत: करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-सोलापुरात नरेंद्र मोदींच्या सभेला ‘विरोधकांना’ धडकी भरवणारी गर्दी

-राहुल गांधींनी देशातल्या महिलांचा अपमान केला- नरेंद्र मोदी

-रामदास कदम हे तर ‘मातोश्री’चे पगारी नेते- निलेश राणे

-माथेफिरू एसटी चालक संतोष मानेची फाशी रद्द; सर्वोच्च न्यायालयानं ठोठावली जन्मठेप

-मोदींना काळे झेंडे दाखवल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांची अमानुष मारहाण