बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ प्रकरणात पार्थ पवारांचं नाव घेताच अजित पवार भडकले, म्हणाले ‘पोरांची नावं घेऊन…’

पुणे | एनसीबी करत असलेल्या कारवाईचे पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. एनसीबीच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेष्ठ पुत्र पार्थ पवार यांचंही नाव या प्रकरणात घेण्यात आलं होतं. यावर अजित पवार यांनी आपलं मत मांडलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.

त्या क्रूझवर एका मंत्र्यांचा मुलगा असल्याचा आरोप होत होता. याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, उगाच कुणाच्या तरी मुलाचं नाव घेऊन त्याचं करिअर का बदनाम करता?, कायदा हा सर्वांसाठी समान आहे, जो कोणीही यात असेल त्याला शिक्षा करा, असं स्पष्ट शब्दात अजित पवार म्हणाले आहेत.

सध्या मोठ मोठ्या व्यक्तींचं नाव घेण्याचा प्रकार राज्यात सुरू आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. प्रशासन तपास करत आहे, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईतील ड्रग्ज प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परिणामी येत्या काळात केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

“अभिनेता आमिर खानने हिंदूच्या भावना दुखावल्या”

100 कोटी डोसचं लक्ष्य खरोखरच पूर्ण झालंय का?- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More