24 तासांमध्ये निर्णय घ्या, अन्यथा पाटीदार रस्त्यावर उतरतील!

अहमदाबाद | काँग्रेसने पाटीदार समाजाच्या मागण्यांवर 24 तासात निर्णय जाहीर करावा अन्यथा पाटीदार रस्त्यावर उतरुन काँग्रेसला विरोध करतील, अशा इशारा हार्दिक पटेलच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीनं काँग्रेसला दिलाय. 

पाटीदार नेते काँग्रेस नेत्यांसोबत बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. मात्र त्यांना तिथेच कुणीच विचारलं नसल्याचं कळतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांनी त्यांचा फोनही उचलला नाही, अशी पाटीदार नेत्यांची तक्रार आहे. 

दरम्यान, काँग्रेस काही उत्तर देणार नसेल तर काँग्रेसच्या पाटीदार नेत्यांनाही विरोध केला जाईल, असं पाटीदार आंदोलन समितीनं म्हटलंय.