बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गरज असेल तरच घराबाहेर पडा, नियमांचं पालन करा- अजित पवार

पुणे | गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार माजवला होता. मात्र, अलिकडे राज्यात कोरोनाचा धोका कमी होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यासह शहरात देखील रुग्णसंख्या कमी झाल्याने नियम शिथील करण्यात आले आहेत. परंतु कोरोनाचा धोका अद्याप पुर्णपणे कमी न झाल्याने गाफील राहून चालणार नाही, यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसंच ग्रामीण भागात जनजागृती करणं गरजेचं आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. तसेच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय घ्यावेत, असे निर्देश अजित पवार यांनी आज दिले आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी आज घेतला. यानंतर ट्वीट करत अजित पवारांनी प्रशासनाला तसेच नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेनं संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचं पालन केलंच पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात देखील धुमाकूळ घातला होता. पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र, याच पुण्यात आता कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड कमी झाली आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी”

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“सरनाईक जे आता बोलले ते आम्ही 18 महिन्यांपूर्वी सांगत होतो, पण तेव्हा तुम्ही ऐकलं नाही”

भन्नाट ऑफर! लस घेतल्यास पब आणि बारमध्ये मिळणार 50% सूट

जम्मू काश्मीरला पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More