Top News खेळ

विराट कोहलीला अटक करा, मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका दाखल करण्यात आलीये. मद्रास उच्च न्यायालयात ही याचिका करण्यात आली आहे.. ऑनलाइन गॅम्बलिंगची म्हणजेच जुगाराची जाहिरात विराट कोहली करतोय. अशा प्रकारांमुळे जुगाराला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय.

चेन्नईमध्ये राहणाऱ्या एका वकिलीने विराट कोहली विरोधात याचिका दाखल केलीये. विराट कोहली सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केलीये.

सध्याच्या तरूणांमध्ये अशा अ‍ॅस्पचं व्यसन वाढत चाललंय. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केलीये. तसंच विराट कोहली, अभिनेत्री तमन्ना हे सेलिब्रिटी अशा अ‍ॅप्सची जाहीरात करून दिशाभूल करतायतत. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलीये.

याचिकाकर्त्याने या याचिकेत एका कर्जबाजारी तरूणाचा दाखला दिलाय. एका तरूणाने या ऑनलाईन अ‍ॅपसाठी पैसे उसने घेतले होते. पण तो तरूण ते पैसे परत करू न शकल्याने त्याने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा याचिकेत दाखला देण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाने रेकॉर्ड मोडला, एका दिवसात मिळाले तब्बल एवढे हजार कोरोनाबाधित!

आधी बेदम मारहाण, नंतर मुंडण करून पाजलं मुत्र, राजस्थानातील संतापजनक घटना!

धक्कादायक! बायकोचा मृतदेह ड्रममध्ये भरून हायवे लगतच्या झाडीत फेकून दिला अन…

रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भडकले

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या