औरंगाबाद महाराष्ट्र

प्लास्टिकमुळे अधिकाऱ्यांनाच भरावा लागला दंड!

लातूर | शासकीय बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे स्वागत करताना प्लास्टिकमधील पुष्पगुच्छ दिल्यामुळे ग्रामिण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना 5000 रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. लातूर जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीच्या वेळेस हा प्रकार घडला. 

राज्यात शनिवारपासून प्लास्टिकबंदी आहे, या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून ठिकठिकाणी दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेकडून याचं पालन होणं गरजेचं होतं.

मात्र, या नियमाचं उल्लंघन शासकीय यंत्रणेकडूनच झाल्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना दंड करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-….अखेर ‘त्या’ आंबटशौकीन अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

-…हे तर मोठे राजकीय षडयंत्र; छगन भुजबळ यांचा आरोप

-होय… मीच गौरी लंकेश यांना मारण्याची सुपारी घेतली!

-ठाकरे कुटुंबाची मान उंचावली; तेजस ठाकरेंनी शोधले आणखी काही दुर्मिळ खेकडे!

-…आणि घड्याळाच्या बॉक्समध्ये निघाला 25 हजार रुपयांचा दगड!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या