नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी ते रवांडाला भेट देणार आहेत. रवांडाला भेट देणारे मोदी पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
रवांडाच्या भेटीत मोदी 200 गायी या देशाला भेट देणार आहेत. गिरिंका या रवांडा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेसाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
‘एक गाय ठेवा’ असा गिरिंकाचा अर्थ होतो. दरम्यान, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. तसेच ब्रिक्स परिषदेतही सहभागी होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे
-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?
-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक
-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे