बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भरधाव रिक्षाच्या धडकेनं तरुणी कोमात, 9 दिवस झाले पोलिसांना रिक्षाचालक सापडेना!

पुणे | पुण्यातील शिवणे-उत्तमनगर भागातील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय धनश्री कुंभार या तरुणीला रस्ता ओलांडताना एका अज्ञात रिक्षाचालकाने धडक दिली. या धडकेत धनश्री खाली पडली आणि नऊ दिवसांनंतर ती कोमात गेली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरोधात धनश्रीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

ती खाली पडल्यानंतर आसपासच्या लोकांनी तिला लगेचच स्थानिक रूग्णालयात दाखल केलं. धडक दिलेली रिक्षा अतिशय वेेगात होती. पुढच्या वाहनांना ओव्हरटेक करत रिक्षावाला रिक्षा चालवत होता. रोड ओलांडताना काही समजण्याच्या आत रिक्षावाल्याने धनश्रीला धडक दिली, ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती धनश्रीचा भाऊ ओंकार कुंभार यांनी दिली आहे.

धनश्रीला पहिले स्थानिक रूग्णालयात नेलं त्यानंतर तिथून तिला नवले रूग्णालयात हलवण्यात आलं. आतापर्यंत तिच्या उपचारासाठी दोन लाख रूपये एवढा खर्च आला आहे. डाॅक्टरांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी वेळ लागेल असं सांगितलं आहे. सध्या तिचा प्रतिसाद हवा तसा मिळत नाही, ती फक्त हाताचे बोटं हालवत आहे. अपघात होऊन नऊ दिवस उलटलं आहे. मात्र अजूनपर्यंत आरोपी रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. पोलिसांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा काम करत नसल्यानं रिक्षाचालकाला पकडणं अवघड आहे. ‘जर गाडी चालवणारा कसाही गाडी चालवणार असेल आणि त्यांच्यावर जर पोलीस कारवाई करणार नसतील तर रस्त्यावर चालणाऱ्यांच आयुष्य धोक्यात आहे, असं ओंकारने सांगितलं आहे.

दरम्यान, तिच्या घरच्यांनी सांगितलं की, धनश्रीला सामाजिक कार्याची फार आवड आहे. त्यामुळे ती गरीब विद्यार्थ्यांना मोफत नागरी सेवा आणि इतर परिक्षांची तयारी करण्यास मदत करते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून ती कायम सक्रिय असते. विविध मोर्चांमध्ये सहभागी होते. त्यांच्या हक्कासाठी लढत असते.

थोडक्यात बातम्या

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घ्या”

“फक्त MPSC परीक्षेमध्येच कोरोना होणार रात्रीच्या पार्टीमध्ये नाही”

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार- कंगणा राणावत

मुंबईची पहिली माफिया क्वीन गंगुबाईची जाणून घ्या खरी कहाणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘या’ ठिकाणी घेतली कोरोनाची लस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More