बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”

पणजी | गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. यावरून विरोधकांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. याला प्रमोद सावंत यांनी उत्तर देत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना अटक केली आहे. मात्र पालकांचीही जबाबदारी आहे. अल्पवयीन मुलांना रात्रभर बाहेर सोडता तेव्हा मुलांच्या सुरक्षेचीही जबाबदारी घ्या, असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. ते गोव्यात माध्यमांशी बोलत होते.

मुली रात्रभर बीचवर फिरतात याची जबाबदारी पालक सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही, असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. या प्रकरणावरून गोव्यातील काँग्रेस नेते अल्टोनीओ डी कोस्टा यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा दर्जा खालावला आहे, अशी टीका त्यांनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

दगडूशेठ गणपतीचा अनोखा उपक्रम, 5 लाख भाविकांनी घेतले दर्शन!

गारवा हॅाटेलच्या मालकाची हत्या, अत्यंत धक्कादायक खरी स्टोरी आली समोर!

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More