प्रणिती शिंदेचा थेट प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल!

सोलापुर |  सोलापुरची लढत राज्याची लक्ष वेधून घेत आहे. अशा परिस्थितीत सोलापुरात दिवसागणिक नवीन घडामोड घडतीये. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवलाय.

अकोल्याच्या माणसाचं इथे सोलापुरात काय काम?? तो माणूस आपल्याला शिकवणार का?? असं करा… तसं करा… अशा शब्दात प्रणितींनी आंबेडकरांवर टीका केलीये.

‘भाजपची बी टीम’ असलेल्या वंचित बहुजन आघाडीला फक्त सांगितलं गेलंय…  सोलापूरला जा आणि पेटवा.. मग आपण त्यांच्या मागे जाणार आहोत काय? असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्य केलंय.

दरम्यान, प्रणिती शिंदेनी आंबेडकरांबरोबर भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-भाजप प्रणीत एनडीए सरकारला 350 जागा मिळतील; रामदास आठवलेंचा दावा

-नाशिकच्या युवकांनी गिरीश महाजनांना पाठवला झंडु बाम आणि मलम!

-नेहरु-गांधी घराण्याचा सन्मान करा अन्यथा…; शरद पवारांचा मोदींना सल्ला

-“कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा”

-भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता; संजय राऊतांची जीभ घसरली