आयत्या बिळावर नागोबा हीच भाजपची भूमिका- प्रणिती शिंदे

सोलापूर | काँग्रेसने सुरु केलेल्या प्रकल्पांची उद्‌घाटन करणे व त्याचे श्रेय घेणे इतकेच काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा हीच भाजपची भूमिका आहे, अशी जोरदार टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. विकासकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भाजप सरकार आल्यापासून गोरगरीबांची अडचण झाली आहे. दोन मंत्र्यांचे एकच काम, भांडणे करा, एकमेकांचे गट सांभाळा एवढेच त्यांचे काम आहे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार… नाईलाजाने हा शब्दप्रयोग करावा लागत आहे, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

-आलोक वर्मांची चौकशी 2 आठवड्यात पूर्ण करा; नागेश्वर रावांवरही लावले निर्बंध

-#MeToo ची खोटी तक्रार तरुणीच्या अंगलट; खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

-“मासिक पाळी आल्यावर स्मृती इराणी संसदेत जात नाहीत का?”

-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चेत शरद पवारांचा सहभाग नसतो!

-अरबी समुद्रातील शिवस्मारकाला आता मराठा सेवा संघाचा विरोध

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या