बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”

बुलडाणा | उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी उपपंतप्रधान म्हणून त्यांच्या हाताखाली काम करावं, अशी खोचक टीका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. प्रविण दरेकर यांनी बुलडाण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख आणि माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या एका लेखासंदर्भात भाष्य केलं. यावरून दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे देशातील संवेदनशील आणि विनम्र नेत्यांपैकी एक आहेत. कदाचित ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सातत्याने आपल्या जनतेसोबत संवाद साधतात, तसंच सर्व तथ्य आणि उणीवा त्यांच्यासमोर मांडून आपलं सरकार कशापद्धतीने करोना महामारीशी लढत आहे हे समजावून सांगतात, असं हर्षल प्रधान यांनी त्यांच्या लेखात लिहिलंय.

जेव्हा उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे पक्षातील कामकाजात सहभाग घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यावेळच्या नेत्यांनी ते वडिलांप्रमाणे वागत नसून किंवा त्यांच्या स्टाइलचं अनुसरण करत नसल्याची टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सांगितलं की, “माझ्या वडिलांनी मला कोणाचंही अनुकरण करु नको, अगदी माझंही असं शिकवलं आहे. मी माझ्या पद्धतीने सामान्यांसाठी चांगली कामं करावीत इतकीच त्यांची अपेक्षा आहे. मी माझ्या वडिलांच्या विचारांचं अनुसरण करतो, स्टाइलचं नाही”

उद्धव ठाकरेंनी मात्र त्या सर्वांना चुकीचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं आहे की, कदाचित ते त्यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांची कॉपी किंवा जनतेचे नेते नाहीत, परंतु मनं कशी जिंकावीत हे निश्चितपणे माहित आहे, असं हर्षल प्रधान यांनी आपल्या लेखात म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

10 सेकंद वाट पाहावी लागली तर आजपासून अजिबात टोल भरु नका!

2 कोटी रुपये जिंकण्याची संधी, ‘या’ सरकारी कंपनीची जबरदस्त ॲाफर

कोरोना व्हायरस कुठून आला?, शास्त्रज्ञांना सापडला मोठा पुरावा

क्लार्कच्या घरावर पडला छापा, संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

कोरोनामुळे आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षणासह केंद्र सरकारच्या मोठ्या घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More